स्वप्रमाणपत्रासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत; शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना सूचना

0
62

साईमत, धुळे, प्रतिनिधी


सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरवात झाली. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली.

उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. णवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि नंतर निवड यादी तयार करून नियुक्ती देण्यात येईल. एकूण किती जागांवर पदभरती होईल, याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टता दिलेली नाही.

दरम्यान, 2018 आणि 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे परीक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना औरंगाबाद खंडपीठाने टेट 2022 परीक्षा देता येत नसल्याचा निर्णय दिला आहे.त्यामुळे या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच टेट 2022 परीक्षा एक वेळ देण्याची तरतूद आहे.मात्र, काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा टेट परीक्षा दिली आहे. अशा उमेदवारांनाही सहभागी होता येणार नाही. तसे दिसून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here