साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
जीपीएस मित्र परिवारातर्फे नवरात्री उत्सवानिमित्त भव्य दांडिया गरबा रासचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जीपीएस परिवारातर्फे भव्य मोफत दांडिया प्रशिक्षण शिबिर बुधवारी, ४ ऑक्टोबरपासून आयोजित केले आहे. दांडिया प्रशिक्षक म्हणून निखिल जोशी असणार आहे. दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी आपली नावे जीपीएस शाळा, श्रीराम नगर पाळधी बु., जय अंबे डेअरी, मेन पाळधी खु. यांच्याकडे नोदविण्याचे आवाहन केले आहे.
दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिर जीपीएस शाळेचे पटांगण, श्रीराम नगर पाळधी बु. याठिकाणी बुधवारी, ४ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ७७६७९४९०९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.