नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन
साईमत/सोयगाव /प्रतिनिधी :
प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप २०२४ मध्ये चोला मंडलम एमएस जनरल इन्श्युरन्स कं. लि. यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढग फूटी, महापूर, दिर्घकाळ पाणी साचून झालेले नुकसान व चक्रीवादळ, वीज पडून लागलेली नैसर्गिक आग आदी कारणांमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास तसेच काढणी पश्चात (१४ दिवस) झालेले नुकसान झालेले असल्यास खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास (Excess Rainfall, Inundation, heavy rainfall) हे पर्याय निवडुन ७२ तासात पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी.
नुकसानग्रस्त पिकविमा धारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात. पिकविमा कंपनीला तक्रारी देण्यासाठी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) ॲप्लिकेशन पुढील लिंकद्वारे गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central या ॲप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे नुकसानीची माहिती द्यावी. तसेच १४४४७ या टोल फ्री क्रमांक, पिकविमा प्रतिनिधी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनाही नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.
अधिक माहितीसाठी सोयगाव तालुका विमा प्रतिनिधी गजानन जाधव (मो.९७६६०९२५४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सोयगाव तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी केले आहे.