रावेर तालुक्यात वादळी पावसाने केळीचे नुकसान

0
10

साईमत, यावल : प्रतिनिधी

रावेर मतदार संघातील अटवाडे, दोधे तालुका रावेर परिसरात रविवारी, २६ रोजी वादळी पावसामुळे केळी पिकांचे झालेल्या नुकसानीची डॉ. कुंदन फेगडे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी दोधे येथील जनार्दन पाटील, सुनील पाटील, गोपाळ पाटील, भूषण महाजन, योगेश पाटील, आटवाडे येथील, रावेर बाजार समितीचे सदस्य जयेश कुयटे, सरपंच किरण कोळी, सदस्य भगवान धनगर, गणेश धनगर, गोपाळ महाजन, एकनाथ पाटील, सुनील महाजन, हितेश पाटील, शेतकरी अलोककुमार गर्ग, संतोष पाटील उपस्थित होते.

वादळी पावसामुळे केळी पिक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला तत्काळ पंचनामे करून खर्च व उत्पादनाचा आढावा लक्षात घेता शेतकऱ्यांना टक्केवारी योग्य प्रमाणात देण्याबाबत विनंती केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डॉ.फेगडे यांना शेतातील पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले. यावेळी शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी धीर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here