Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»मानवी आरोग्यासाठी लाभदायक गुणधर्म असणारे ‘पॅशन फ्रुट’ फळाची लागवड
    कृषी

    मानवी आरोग्यासाठी लाभदायक गुणधर्म असणारे ‘पॅशन फ्रुट’ फळाची लागवड

    Milind KolheBy Milind KolheSeptember 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या ‘पॅशन फ्रुट’या नवख्या फळ पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. विशेष बाब म्हणजे ‘पॅशन फ्रुट’ या फळ लागवडीचा या परिसरातील पहिलाच प्रयोग आहे.’पॅशन फ्रुट’या फळांमध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक गुणधर्म आहेत.

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील प्रयोगशील युवा शेतकरी अमर पांडुरंग बरळ यांनी राजस्थान, मध्यप्रदेश सीमेवरील किसान गड येथून बिया आणून नैसर्गिक रोपे तयार केली. तयार झालेली शंभर रोपांची त्यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केली. म्हणजेच ओळीतील अंतर दहा फूट आणि रोपातील अंतर सात फूटवर बांबूच्या साह्याने लागवड केली.

    ‘पॅशन फ्रुट’हे वेलवर्गीय फळ आहे. त्यामुळे याला औषधाची गरज भासत नाही. शेणखताचा वापर केल्याने फळे चांगली लागतात. या फळाला कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. केवळ फळ माशांवर नियंत्रण ठेवावे लागते. यासाठी या युवा शेतकऱ्याने फळ माशांचे ट्रॅप लावून माशांवर नियंत्रण ठेवले आहे.’पॅशन फ्रुट’हे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात आहे. सध्या हे फळ काढणीला आले आहे.

    ऑनलाइन विक्री करण्याचा मानस

    मेट्रो सिटी मध्ये या फळाला सर्वाधिक मागणी आहे. सुरुवातीला या फळांच्या विक्रीचे व्यवस्थापन पुणे येथे केले होते. सध्या उत्पादन जास्त असल्याने बरळ या शेतकऱ्याचा ऑनलाइन विक्री करण्याचा मानस आहे. बिगबास्केट, ॲमेझॉन, रिलायन्स या ऑनलाइन प्लॅटफार्मवरून मागणी आहे. त्यानुसार सॅम्पल देऊन दर निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार फळांची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    या फळ पिकाच्या लागवडीसाठी स्टेजिंग करणे आवश्यक असते. यासाठी एकूण तीन लाख रुपये खर्च आला एकदा स्टेजिंग केल्यानंतर पुढे दहा ते बारा वर्ष त्याचा खर्च येत नाही. आत्ता काढणीला आलेल्या पिकातून साडेतीन ते टन माल निघेल. आणि त्याच्यातून ४ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे बरळ यांनी सांगितले..

    ‘पॅशन फ्रुट’या फळाचे गुणधर्म..

    * डेंगूं आजारावर लाभदायक * पांढऱ्या पेशी नियंत्रणात ठेवते
    * रोग प्रतिकारशक्ती वाढवते * हृदयासाठी लाभदायक
    * विटामिन -सी युक्त गुणधर्म आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    2026 Calendar : जळगाव जनता सहकारी बँकेच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन

    December 19, 2025

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.