साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२२ मधील प्रलंबित असलेली उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील ५ हजार २०१ शेतकऱ्यांना ४ कोटी ३ लाख ६४ हजार ३८६ रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यामध्ये कापूस पीकासाठी ५ हजार १६८ शेतकऱ्यांना ४ कोटी १ लाख ९० हजार ९५४ रुपये, उडीद पीकासाठी ९ शेतकऱ्यांना ७७ हजार २२९ रुपये, मूग पिकासाठी २४ शेतकऱ्यांना ९६ हजार २०३ रुपये अशी पीकविमा मदत शेतकऱ्यांना वितरित होणार आहे
तसेच खरीप हंगाम २०२३ मध्ये पात्र सर्व ५७ हजार पीकविमाधारक शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई मिळणार आहे. केंद्र आणि राज्यातील भाजपा-महायुती सरकार अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.