Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तांदूळ विकणाऱ्या अंगणवाडीसेविकेसह मदतनिसावर गुन्हा
    क्राईम

    तांदूळ विकणाऱ्या अंगणवाडीसेविकेसह मदतनिसावर गुन्हा

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तांदूळ विकणाऱ्या अंगणवाडीसेविकेसह मदतनिसावर गुन्हा

    जळगांव (प्रतिनिधी)-

    जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील ० ते ३ वर्षे वयोगटातील अंगणवाडीच्या बालकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळाची परस्पर विक्री झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. हा तांदुळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून फत्तेपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

    प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती भिसे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती कदम यांचेसह फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.देऊळगावगुजरी येथील अंगणवाडी सेविका लता मोरे व मदतनिस ज्योती माळी यांनी संगनमत करून अंगणवाडी शालेय पोषण आहाराचा ११२ किलो तांदूळ किंमत फत्तेपूर येथील साहिल कुरेशी व जुबेर कुरेशी यांना विक्री केला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

    पंचनामा करून मुद्देमालासह तांदुळ खरेदी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांनी मदतनिस व सेविका यांनी तांदूळ विकल्याची कबूली दिली.

    स.पो.निरीक्षक गणेश फड यांनी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याशी संपर्क साधला. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी भारती भिसे व पर्यवेक्षिका ज्योती कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तपास स.पो.नि.गणेश फड, हेड कॉ . प्रविण चौधरी, गनी तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.