क्रिकेट हा संघ भावनेचे प्रतिक असणारा खेळ – मंत्री गुलाबराव पाटील

0
12

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग क्रिकेट क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पालकमंत्री क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे नम्र आवाहन त्यांनी केले.

एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या क्रिकेट मॅच मध्ये देखील चौकार – षटकारासह फटेकबाजी करताच उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली. स्पर्धेचे आयोजन विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व न्यू जय बजरंग क्रिकेट टिमचे सदस्यांनी केले आहे.

म्हसावद येथील न्यू जय बजरंग क्रिकेट क्लबतर्फे कालपासून पालकमंत्री क्रिकेट चषक सुरू झाला असून म्हसावद येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते चेंडू टोलवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत पालक मंत्र्यांकडून ३१ हजाराचे पाहिले, पवन सोनवणे यांच्याकडून २१ हजाराचे तर सरपंच गोविंद पवार यांच्या तर्फे ११ हजाराचे तिसरे पारितोषिके आहेत. यात अनेक संघ सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तत्कालीम पं. स. उपसभापतीपती समाधान चिंचोरे , सरपंच गोविंद पवार, आयोजक – विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व न्यू जय बजरंग टिमचे सदस्य, उपसरपंच बाळू चव्हाण, ग्रा.पं. सदस्य बापू धनगर, विकी चव्हाण, सुधाकर पाटील, इंदल भोई तसेच महेंद्र पाटील , हौशीलाल परदेशी, प्रमोद खोडपे यांच्यासह परिसरातील युवा क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here