पत्रकारांकडून समरसता, सकारात्मक पत्रकारिता अपेक्षित

0
23

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

लोकशाहीचा विश्‍वनीय चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आहे. सद्यस्थितीला पत्रकारांकडून समरसता, सकारात्मक पत्रकारिता अपेक्षित असल्याचे प्रतिपादन प.पू. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संलग्न पत्रकार संस्था, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व नवरत्न पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. पत्रकार संस्थेतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकारांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील सामाजिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देत ‘नवरत्न’ पुरस्काराने महामंडलेश्‍वरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. शैलेश खाचणे, सावदा येथील हाजी शब्बीर हुसेन (बाबु सेठ), माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, डायमंड इंग्लिश मीडियम स्कुलचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून शेख, बामणोद ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल तायडे, विसडम इंग्लिश मीडियम स्कुलचे अध्यक्ष मलक शरीफ, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. आर. पाटील, इंजिनिअर कलीम हाजी सलीम खाटीक, पवन अनिल सराफ, दर्दमंद फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मोहमंद ईलियास, हकीम ऐमत तडवी, पिंपरुड ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला कोळी, संभाजीनगर येथील कांचन विसपुते, फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष साजीद शेख हमिद, मेहेर निगार मोहम्मद इलयास, सावदा येथील सिटी हॉस्पिटलचे डॉ. अन्सार हाजी गुलाम गौस आदी मान्यवरांना ‘नवरत्न’ पुरस्कराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी मंत्रालय विधान मंडळ वार्ताहर संघाचे ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, श्रीराम पाटील, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, माजी प्राचार्य एस.एस.पाटील, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, केतन किरंगे, राकेश जैन, कलीम मणियार, शेख कुरबान, चंद्रशेखर चौधरी, माजी नगरसेवक शेख जफर, पीआरपीचे आरीफ शेख कलीम, डॉ. दानिश शेख, भाजपचे आरीफ शेख रशीद, संजय रल, माजी सैनिक गंगाधर कोळी, भाजपाचे शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज, वसीम जनाब, मुदतसर नजर, प्रहारचे शहराध्यक्ष मोहसीन शेख, माजी नगरसेवक महेबुब पिंजारी, अशोक भालेराव, अरमान तडवी, सुरेश सेठ, साकळीचे सरपंच दीपक पाटील, माजी नगरसेवक रशीद तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप पाटील तर सुत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here