साईमत जळगाव प्रतीनिधी
विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीए-एमसीए विभागात प्राध्यापक-पालक सभे प्रसंगी बोलत होत्या.
व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे उपस्थित होते.
पालकांना मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. पालकांनीदेखील आपल्या मुलाच्या महाविध्यालयातील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तसेच त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
त्यांनी बीसीए-एमसीए क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच प्राध्यापकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश – विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण असली पाहिजे असे सांगितले.
सभेचे समन्वयक व एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख यांनी आपल्या आभार प्रदर्शनात सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शकानी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाचे उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
प्रा. विनोद महाजन यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा.मनिषा राजपूत, प्रा.मानसी दुसे, प्रा हर्षिता तलरेजा, प्रा.कविता भंगाळे यांनी सहकार्य केले. सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले
