पत्रकार परिषदेत मंडळ पदाधिकाऱ्यांसह केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
साईमत/रावेर/प्रतिनिधी :
गेल्या जून महिन्यापासून निंभोरा फळबागातदार शेतकरी मंडळाद्वारे निंभोरासह परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी परप्रांतात पाठविल्या जात अाहे. त्यामुळे येथील छोट्या-मोठ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला समाधानकारक मिळत आहे. मात्र, हे सुरू असताना निंभोरा स्टेशन येथून पाठवला जाणारा केळी भरलेला वॅगन्स रॅक बंद पडावा, यासाठी रावेर येथील केळी युनियनच्या शिष्टमंडळाने प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप निंभोरा येथील फळबागायतदार शेतकरी मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळ पदाधिकाऱ्यांनी व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत मंडळाचे संचालक किरण नेमाडे, केळी उत्पादक शेतकरी ललित कोळंबे, ॲड.चंद्रजीत पाटील यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी रावेर येथील फळबायतदार शेतकरी युनियन मंडळाचे पदाधिकारी व काही केळी उत्पादकांनी दिल्ली येथे जाऊन केळी व्यापाऱ्यांची भेट घेऊन निंभोरा येथील फळबागायतदार शेतकरी मंडळांनी पाठवलेल्या केळी या निकृष्ट दर्जाची केळी भरत असल्याचे ठरवून त्यांना भावात प्रत्येक क्विंटल मागे ५०० रुपये भाव कमी किमान कमी द्यावे, यासाठी चुकीची माहिती देऊन प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे निंभोरा येथील केळी वॅगन्स रॅक बंद पाडावा व केळी उत्पादन शेतकऱ्यांना त्रास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
रावेर येथील धनाढ्य केळी उत्पादक, व्यापारी यांच्याकडून निंभोरा येथून केळी वॅगन्स रॅक भरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ज्या दिवशी निंभोरा येथून केळी वॅगन रॅक भरल्या जातात त्याच दिवशी रावेर येथील युनियन मंडळ पदाधिकाऱ्यांनी व धनाढ्यांनी केळी व्यापाऱ्यांनी निंभोरा येथे रेल्वे स्थानकावर वॅगन्स रॅक उपलब्ध करून घेतला आहे. कारण निंभोरा येथील केळी उत्पादकांना रॅक मिळू नये, म्हणून कटकारस्थान आहे. त्याचबरोबर निंभोरा व रावेर येथून एकाच दिवशी रॅक पाठवल्यास दिल्ली येथील केळी मार्केटमध्ये भावात घसरण व्हावी. हा एकमेव उद्देश या केळी व्यापाऱ्यांचा दिसून येत आहे. कटकारस्थानात रावेर येथील केळी युनियनचे पदाधिकारी व केळी उत्पादक रामदास त्रंबक पाटील, संजय विश्वनाथ पाटील, ऍड.आर.आर. पाटील, किशोर उर्फ बंटी गनवाणी, सतीश पाटील, नितीन गनवाणी, संजय अग्रवाल, हे सतत दिल्ली येथील केळी मार्केटमध्ये विनाकारण शेतकऱ्यांना तोटा व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत संचालक किरण नेमाडे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेत केळी उत्पादक शेतकरी कडू चौधरी, किरण नेमाडे, ललित कोळंबे, ॲड.चंद्रजीत पाटील, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, सुधीर भंगाळे, धीरज पाटील, चंद्रकांत चौधरी, राहुल गुरव, सुरेश चौधरी, बंशी राठोड, भूषण चौधरी यांच्यासह आदी केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.