संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दूचाकी रॅलीसह निघाली पालखी मिरवणूक
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
श्रीसंत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिर कृष्णापुरी येथे विठ्ठल रुख्मिणी, श्रीसंत सेना महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजन करुन स्थापना करण्यात आली. सकल नाभिक संस्थेच्या जागेवर आ.किशोर पाटील यांच्या आमदार निधीतून सभा मंडपाचे कार्य पूर्ण झाले. त्यानिमित्त सभा मंडपाचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. द्वारकाधीश नगर, कृष्णा रेसिडेन्सीजवळ जुना अंतुरी रोड येथून द्वारकाधीश नगर ते श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. दुपारी १२ वाजता आरती करून महाप्रसाद कार्यक्रम झाला. दुपारी पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ९ वाजता ह.भ.प. गोविंद महाराज, पाचोरेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर येथे झाला.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष नरेश गर्गे, उपाध्यक्ष योगेश चित्ते, खजिनदार बारकू चित्ते, सचिव रमेश वारुळे, सहसचिव फकीरा शिरसाठ, कार्यकारी मंडळ चिंतामण जाधव, संजय अहिरे, सुनील चित्ते, नितीन अहिरे, जगदीश सोनवणे, चेतन चित्ते, दिलीप जाधव, कैलास वाघ, रवींद्र चित्ते, समाधान सैंदाणे, दीपक चित्ते, शंकर अहिरे, दिलीप शिरसाठ, विनोद अहिरे, मधुकर सोनवणे, राजेंद्र सोनवणे, मधुकर महाले, मनोहर सोनवणे, साहेबराव सैंदाणे, अशोक चित्ते, पितांबर नेरपगार, राजेंद्र सोनवणे, मनोहर वेळीस, अमोल पगारे, कुणाल जाधव, रोहित जाधव, शुभम जाधव, राजेंद्र जाधव, अजय जाधव, गोपाल चित्ते, प्रवीण कुवर, कैलास अहिरे, मनोज अहिरे, नंदलाल शिरसाठ, दीपक ठाकरे, प्रकाश चित्ते, देवेंद्र चित्ते, सुभाष अहिरे, प्रकाश पगारे, राजेंद्र चित्ते, ललित चित्ते, आकाश जाधव, प्रशांत सैंदाणे, भगवान बिळकर, शरद वारुळे, सुधीर वारुळे, स्वप्निल वारुळे, विजय निकम, निंबा वाघ, रमेश सैंदाणे, प्रवीण सैंदाणे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.