पाचोऱ्यात आ. किशोर पाटील यांच्या हस्ते गुरुवारी विकास कामांचे भुमिपूजन

0
7

२४ कोटींच्या विकास कामांचा समावेश, क्रीडा संकुलनामुळे खेळाडूंची प्रतीक्षा संपली

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

शहरालगतच्या काकणबर्डीतील खंडेराव महाराज मंदिराचा परिसर विकसित करणे, तालुक्यातील खेळाडूंसाठी क्रीडा संकुल, तालुका कृषी भवन इमारतीचे भुमीपूजन समारंभ अशा २३ कोटी रूपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गिरड रस्त्यावरील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात जिल्ह्यातील पहिले १३ कोटी ९० लाखांचे अत्याधुनिक कृषीभवन उभारण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्राअंतर्गत शहरालगत काकणबर्डी येथील खंडेराव महाराज मंदिराचा परिसर पाच कोटी रूपयांच्या निधीतून विकसित करण्यात येणार आहे. सोबतच तालुक्यातील खेळाडूंचे स्वप्न साकार करण्यासाठी पाच कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक क्रीडा संकुलनाचे विकास काम करण्यात येणार आहे. क्रीडा संकुल होणार असल्यामुळे खेळाडूंची संपली प्रतीक्षा आहे.

यांची लाभणार उपस्थिती

कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार विजय बनसोडे, नवनाथ सोनवणे, रवींद्र नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बोरसे, मुख्याधिकारी मंगूश देवरे, भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, विकास पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, प्रदीप देसले, पदमसिंग पाटील, डाॅ.भरत पाटील, युवराज पाटील, संजय गोहिल, नरेंद्र पाटील, पंढरी पाटील, डाॅ.विशाल पाटील, किशोर बारवकर, जितेंद्र जैन, वसंत पाटील, रमेश पाटील, राहुल पाटील, प्रकाश तांबे, मनोज सिसोदिया, लखीचंद पाटील, युसफ पटेल, विशाल पाटील, राजेंद्र परदेशी, ज्ञानेश्वर सोनार, भोला पाटील, सुमित सावंत, समाधान पाटील, सुधाकर पाटील, जगदीश पाटील, रमेश जाधव, दीपक पाटील, गणेश भगुरे, जगदीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला पाचोरा शहरासह तालुक्यातील शेतकरी, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बालाजी कन्स्ट्रक्शन परिवारातर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here