साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन कार्यक्रम नुकताच झाला. उद्घाटन प. रा.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांनी अमृत कलशात एक मूठ माती टाकून केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण वळवी, उपप्राचार्य प्रा.संदीप पालखे, चोपडा विभागाचे माजी विभागीय समन्वयक डॉ.संजय शिंगाणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अभिजीत जोशी, डॉ.गौरव महाजन, प्राध्यापक बंधू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात रासेयोमध्ये प्रवेशित असलेल्या स्वयंसेवकांनी आपापल्या गावातून एक मूठ माती आणून अमृत कलशात संकलित केली. महाअभियानात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांनी कलशात माती टाकतानाचा स्वतःचा फोटो काढून ‘सेल्फी विथ मेरी माटी’ संकेतस्थळावर अपलोड केले.