साईमत जळगाव प्रतिनिधी
सिद्धिविनायक विद्यालय , नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त सिद्धिविनायक विद्यालय परिसरात स्वच्छता अभियानची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉक्टर अमृता सोनवणे नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत कवटे, समीर दाभोळकर, खुशबू ठाकूर, पी एस. पाटील, संदीप पाटील, रेखा सपकाळे, सुरक्षा अधिकारी गुलाबराव महाजन, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे ,गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी स्वच्छता पंधरवडा निमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून खुशबू ठाकूर यांनी स्वच्छता विषयावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून उत्तराच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सांगितले. तसेच विद्यालयातील केवल पाटील, कृष्णा सपकाळे, रुचिता पाटील, नितीन विश्वकर्मा,नविका खेडवान, हितेश चौधरी, कार्तिक लोहार, प्रांजली शिंपी, अरमान झा या आपली मनोगते व प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभागी होऊन गांधीजींनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न व स्वच्छतेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
क्रीडा शिक्षक अनिल माकडे यांनी स्वच्छता पंधरवाडा निमित्त सर्वांना स्वच्छता शपथ दिली कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आर.पी.खोडपे यांनी मानले.