Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»चिंचपाणी धरण वाहू लागले ‘ओव्हर फ्लो’
    कृषी

    चिंचपाणी धरण वाहू लागले ‘ओव्हर फ्लो’

    SaimatBy SaimatAugust 8, 2024Updated:August 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण, धरण पाहण्यासाठी होतेय गर्दी

    साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी:

    बहुतांश भागात पावसाचा जोर वाढून अनेक नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत होता. मात्र, चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील २० ते २५ गावांसाठी सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या सातपुड्यातील चिंचपाणी धरणात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठा एवढे पाणी जमा झाले असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने हे धरण प्रथमच तुडूंब भरून ‘ओव्हर फ्लो’ वाहु लागल्याने शेतकरी वर्गाच्या आनंदाला उधाण आले आहे. धरण पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होत आहे.

    चोपडा तालुक्याच्या पुर्व भागातील बिडगाव, मोहरद, धानोरा, वरगव्हान कुंड्यापाणी, लोणी खर्डी, पंचक, देवगाव, पारगाव यांच्यासह अनेक गांवाना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारे बिडगांव जवळील सातपुडा जंगल हद्दीत येणारे चिंचपाणी धरण गेल्या तीन वर्षांपासून भरतच नसल्याने बागायती शेतीवर मोठा परिणाम झाला होता. जलपातळी कधीनव्हे ईतकी खोल गेली आहे. तब्बल ९५ टक्के विहरी यावर्षी कोरड्या ठाक पडल्या. तर लाखो रूपये खर्चुन केलेल्या ट्युबवेल्सही बंद पडत आहेत. त्याचा मोठा फटका बसुन यावर्षी शेकडो एकरवरील जगविलेल्या केळी बागा परिसरात जळून गेल्या. शेतकरी वर्ग पाण्याच्या खर्चापाई आर्थिक संकटात सापल्याचे धक्कादायक चित्र यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले. मात्र, यावर्षी समाधानकारक वाटणाऱ्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून परिसरात संततधार पावसाची हजेरी लावली होती. तरीही धरणात मात्र फक्त मृत साठाच जमा झाला होता. अशा आशयाचे वृत्तही दै. ‘साईमत’ मध्ये २५ जुलै रोजी प्रसिध्द केले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील सातपुडा भागात जोरदार पाऊस पडल्याने शुक्रवारी रोजी सकाळी ११ वाजता धरण पूर्णपणे ओसंडून भरून वाहु लागले आहे.

    बागायती शेतीसाठी होणार लाभ

    धरण भरण्याची आशा बाळगुन असलेल्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहचताच त्यांच्या आनंदाला उधाण आले. धरणाकडे येणाऱ्यांच्या मोठी गर्दी येथे झाली. हे धरण भरल्याने परिसरातील तब्बल दोन डझनावर गावांना सिंचणासाठी पाण्याची समस्या सुटणार आहे. जलपातळीत मोठी वाढ होऊन बागायती शेतीसाठी लाभ होणार आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    “जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया : पंकज शिंदे”

    January 13, 2026

    Dhanora, Chopda Taluka:वाचन हे स्पर्धा परीक्षेचे आधार कार्ड” – खुशबू महाजन यांचा संदेश

    January 1, 2026

    Chopda : ध्येय निश्चितीशिवाय यश नाही : गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.