Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्यांनी घेतला बाल मेळाव्याचा आनंद
    चाळीसगाव

    भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्यांनी घेतला बाल मेळाव्याचा आनंद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    येथील हिरापूर रस्त्यावरील भास्कराचार्य इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल (सीबीएस पॅटर्न) येथे चिमुकल्यांनी बाल मेळाव्याचा आनंद घेतला. बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावली होती. त्यामुळे मेळाव्यात मोठी आर्थिक उलाढाल झाली. यावेळी शिक्षकांसह पालकांनी मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला. बाल मेळाव्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान समजण्यास मदत झाली. आपण व्यवसाय करू शकतो हा आत्मविश्‍वास त्यांच्यात आला. यावेळी बहुतांश पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पाच सर्वोत्कृष्ट चिमुकल्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

    चाळीसगाव येथील अर्जंट मोबाईलचे संचालक, युवा उद्योजक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तनवीर भाई शेख यांची मुलगी भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कुल नेताजी चौक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आलीना शेख तनवीर हिला घरी मेहनत करून स्वादिष्ट मेनू बनवून त्याची उत्कृष्ट विक्री केल्याबद्दल दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
    आलीना शेख तनवीर हिला प्राचार्य श्रद्धा ठाकूर, उपप्राचार्य सीमा वर्मा, ॲड. रोहिणी देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्रासह पारितोषिक देण्यात आले.

    आलीना शेख हिला मिळालेल्या यशात प्राचार्य श्रद्धा ठाकूर, श्रीमती मुस्कान, सोनवणे, सलमान, पंकज पवार, कविता शिंदे, कांचन मिश्रा, श्रीमती जयश्री, श्री.कुंदन यांच्यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आलीनाला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.