स्वस्त स्मार्टफोन उद्या भारतात लाँच होणार, पाहा डिटेल्स

0
20

साईमत लाईव्ह दिल्ली वृत्तसंस्था  

Motorola भारतात उद्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Moto G62 स्मार्टफोनला उद्या ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. लाँचिंग आधी मोटोरोला आपल्या या स्मार्टफोन संबंधी अनेक डिटेल्स शेअर करीत आहे. या फोन मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिला जाणार आहे. या फोनला यावर्षी ब्राझील मध्ये ग्लोबली लाँच करण्यात आले होते. परंतु, भारतात लाँच होणाऱ्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असू शकतात. जाणून घ्या या फोनसंबंधी सर्वकाही.

मोटोरोला इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत Moto G62 ला भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. परंतु, या फोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला नाही. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त ५जी फोन असणार आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर, फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि १२ ५जी बँडचा सपोर्ट मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर मिळेल Moto G62
मोटोरोलाने ही माहिती दिली आहे. मोटो जी ६२ ला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर खरेदी करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. फोनला ब्लॅक आणि ग्रीन रंगात लाँच केले जावू शकते.
ब्राझील मध्ये स्मार्टफोनला वेगळ्या स्पेसिफिकेशन सोबत लाँच करण्यात आले होते. ब्राझील मध्ये लाँच करण्यात आलेल्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४८० प्लस प्रोसेसर दिले होते. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला होता. हा फोन 20W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी सोबत येतो. या फोनला ब्राझीलमध्ये फक्त ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here