एस.टी.चेआरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक
साईमत।पहुर, ता.जामनेर।प्रतिनिधी।
येथे सकल धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्यावतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात केली. येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. उपोषणस्थळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, ईश्वरबाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, अशोक देशमुख, शिवसेनेचे नेते गणेश पांढरे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, ॲड एस.आर.पाटील, शैलेश पाटील, ज्ञानेश्वर करवंदे, अरुण घोलप, किरण पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच शाम सावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, अरविंद देशमुख, संजय तायडे, विनोद पाटील, सुनील पाटील, अमोल पाटील, अशोक पंढरी पाटील, महेश पाटील, विनोद पाटील, शांताराम गोंधनखेडे, भाऊराव गोंधनखेडे, सुकलाल बारी, अशोक देशमुख,पंडित सर, शरद पांढरे यांच्यासह समाज बांधवासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.