पाचव्या थरावर जाऊन सागर कोळी, नवल कोळी ठरले ‘गोविंदा’
साईमत/लोहारा, ता. पाचोरा/प्रतिनिधी :
येथील बस स्टॉप परिसरात सालाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी गोपाळकाल्याचा (दहीहंडी) उत्सव साजरा करण्यात आला. सुरुवातीला ‘टेबल दहीहंडी’ फोडण्यात आली. ‘टेबल दहीहंडी’ फोडण्याचा बाल गोविंदाचा मान साई बापू चव्हाण याने मिळविला. उत्सवात येथील पोलीस, आर्मी भरतीचा सराव करणारे मुले तसेच गावातील विविध मंडळ, कुस्तीगीर पहिलवान ग्रुप स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. अथक प्रयत्नानंतर पाच थरांवर जाऊन सागर कोळी, नवल कोळी याने दहीहंडी फोडून ‘गोविंदा’चा मान मिळविला. लोहारासह परिसरातील लहान, थोर अबालवृद्ध दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. जय अंबिका डफ मंडळाने वाजंत्री वाजवून सर्व गोपाळांचा उत्साह वाढवला.
यावेळी आयोजक भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार, कैलास चौधरी, सुनील क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, सुरेश चौधरी, सुनील देशमुख, उमेश देशमुख, विकास देशमुख, संजय चौधरी, नाना चौधरी, योगेश शिंदे, अविनाश चौधरी, हितेश पालीवाल, शरद कोळी, मुकेश पालीवाल, राजु गीते, रमेश चौधरी, शिवराम भडके, कैलास मिस्तरी, नंदू सुर्वे, उखा बावस्कर, मनोज अंबिकर, भगवान शिंदे, दीपक चौधरी, कामा पैलवान, पत्रकार गजानन क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, रमेश शेळके यांच्यासह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीराम कलाल तर भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार यांनी आभार मानले.