Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»कुऱ्हा काकोडा महाविद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा
    कृषी

    कुऱ्हा काकोडा महाविद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडाच्यावतीने महाविद्यालयाच्या उद्यानात वडोदा कुऱ्हा वनविभागाचे वनरक्षक सुधाकर कोळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. पिंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा कुऱ्हा पॅटर्न उपस्थितांसमोर मांडला.

    मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा महाविद्यालयामार्फत इको ब्रिक्सची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा वापर करून विविध उपयोगी फर्निचर बनविण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी घरातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर इको ब्रिक्स (प्लास्टिकच्या विटा) बनविण्यासाठी केला जात आहे. आम्ही परिसरातील शाळांना इको ब्रिक्स चॅलेंज या उपक्रमात सहभागी करून घेतले. सर्वप्रथम परिसरातील सहा शाळांना आम्ही भेटी दिल्या व तेथील विद्यार्थ्यांना इको ब्रिक्सचे महत्त्व पटवून दिले. इको ब्रिक्स कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण दिले. त्यातूनच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी इको ब्रिक्स जमा करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र सुद्धा दिले. एका महिन्यात शालेय विद्यार्थ्यांनी आमच्याकडे जवळपास १०० इको ब्रिक्स जमा केल्या आणि हा प्रवास अजूनही सुरू आहे.

    इको ब्रिक्सचे फायदे प्रामुख्याने असे

    पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी उपयोगी, घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे शक्य, विविध आकृती आणि साहित्य बनविण्यासाठी उपयुक्त, वर्षानुवर्षे टिकू शकणाऱ्या याव्यतिरिक्त बीज संकलन अभियान, कापडी पिशवी वापरा अभियान, इको ब्रिक्स चॅलेंज, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती, सेंद्रिय शेती जागृती, पक्षी संवर्धन अशा सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.