साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
शहरात गेल्या महिन्यात गणेशोत्सव आणि ईद मिलाद सण, उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवासह आगामी सण उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करून वेळेत दुर्गा विसर्जन मिरवणूक समारोप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले. ते फैजपूर येथील पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. शारदीय नवरात्र दुर्गोत्सवानिमित्त फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना नवरात्र व आगामी सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात नगरपालिकेला साफसफाईसाठी व विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजण्यासाठी तसेच विजेचे प्रश्न उद्भवणार नाही. यासाठी वीज महावितरण कंपनी कार्यालयाला पत्र दिले असल्याचे सांगितले. फैजपूर शहर चांगले गाव आहे. शहरातील नागरिकही चांगले आहे. नवरात्रसह आगामी सण उत्सव साजरे करतांना सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, वीज महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विनोद सरोदे, पोलीस उपनिरीक्षक मकसुद्दीन शेख उपस्थित होते. बैठकीला अब्दुल रऊफ जनाब, नितीन राणे, माजी उपनगराध्यक्ष कलिम खा मण्यार, रशिद तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, मलक शरीफ, रईस मोमीन, वसीम जनाब, मुद्स्सर नजर, शेख फारूक अब्दुल्ला, रामा होले, वैभव वकारे, पिंटू तेली, शेख अहमद यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.