सांगवीतील दंगलीची सीबीआय चौकशी करा

0
16

साईमत,धुळे : प्रतिनिधी

सांगवीतील दंगलीनंतर आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचे सांगत विविध आदिवासी संघटनांतर्फे शुक्रवारी धुळे येथे मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारल्याने निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन निव्ोदन दिले.

सांगवी येथे विश्‍व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स १० ऑगस्टला चारण समाजातील लोकांनी फाडले. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासींना चारणांनी जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. सांगवी (ता. शिरपूर) येथील दंगल नियंत्रणासंदर्भात पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह असून, या दंगलीची ‘सीबीआय’तर्फे चौकशी करावी, शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे व सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांची बदली करावी, आदिवासी युवकांवरील गुन्हे मागे घ्याव्ोत, अशा मागण्या विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निव्ोदन देऊन केल्या. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक हिरे व सहाय्यक निरीक्षक खलाणे यांची तातडीने बदली करावी, दंगलीची सीबीआय चौकशी करावी, खरे गुन्हेगार हुडकून काढाव्ोत आणि युवकांवरील गुन्हे मागे घ्याव्ोत, अशा मागण्या भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, तालुकाध्यक्ष ईश्‍वर मोरे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here