साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त गांधी उद्यान आणि भाऊंचे उद्यान येथे कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी कर्करोगाविषयी माहिती दिली.
कर्करोगासाठी घ्यावयाची काळजी, आहार , व्यायाम, पाळावयाचे पथ्य याविषयी माहिती दिली. तसेच काही कर्करोगाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्यास वेळीच तपासणी करावी, जेवणात भाकरी, बाजरी , तृण धान्याचा वापर वाढवावा, असेही डॉ. चांडक यांनी सांगितले. उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन ही त्यांनी केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे यांनी प्रास्ताविक केले. मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. आनंद दशपुत्रे यांनी डॉ चांडक यांचा परिचय करून दिला तर डिस्ट्रिक्ट कॅन्सर अवेअरनेस कमिटी समन्वयक रमण जाजु यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष सुनील सुखवाणी यांनी आभार मानले.
डिस्ट्रिक्ट कॅन्सर अवेअरनेस कमिटी चेअरमन डॉ. राजेश पाटील, रोटरी जळगाव वेस्ट मानद सचिव मुनिरा तरवारी, योगेश भोळे, संजय इंगळे, चंदू सतरा, सचिन वर्मा यासह मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन , मनीष शाह यांचे सहकार्य लाभले.