लखनऊ ः
उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम प्रवाशांना नमाज पठणासाठी दोन मिनीट बस थांबवल्यामुळे एका बस वाहकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी समोर आला होता. दोन दिवसांपूर्वी या बसवाहकाने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली असून आता उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळावर या वाहकाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.
३२ वर्षीय मोहित यादव उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होते. ३ जून रोजी कौशंबीवरून दिल्लीच्या दिशेने जाणारी बस त्यांनी रामपूरनजीक दोन मिनिटांसाठी थांबवली होती.बसमधील काही मुस्लीम प्रवाशांना नमाज पठनासाठी त्यांनी बसचालक के.पी.सिंह याला दोन मिनिटांसाठी बस थांबवायला सांगितली मात्र याविरोधात काही लोकांनी तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहित यादव यांना नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.२८ ऑगस्ट रोजी रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.