साईमत, धुळे: प्रतिनिधी
देवपूर भागातील वडेल रोडवरील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड आणि दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.पोलीस कॉलनीत बांधकाम विभागात उपअभियंता राहुल बापू जाधव यांचे सद्गुरू कृपा नामक निवासस्थान आहे.
राहूल जाधव यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यामुळे रविवारी ते कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले.रक्षाबंधन असल्याने त्यांची पत्नी नाशिकला माहेरी थांबली. बंद घराची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रव्ोश केला. कपाटाचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने आणि १२ ते १५ हजारांची रोकड लंपास केली. राहूल जाधव यांच्या शेजारील निवृत्त पोलिस विजय गुरव यांच्या लक्षात ही घरफोडी आली. त्यांनी घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना दिली.