Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»सावद्यात एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्त्या
    क्राईम

    सावद्यात एकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्त्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, सावदा, ता.रावेर ः वार्ताहर

    सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे एक कि.मी.च्या अंतरावर कोचुर रस्त्यावरील रस्त्यालगत असलेले लोकेश सुभाष बेंडाळे रा.सावदा यांचे शेत गट नं.६५६ येथील बांधलेल्या खोली क्रं.२ मध्ये एका पुरुषाची दगडाने ठेचून हत्त्या झाल्याने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रस्त्यावर असलेल्या लोकेश सुभाष बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार असलेल्या शोभाराम रीचू बारेला उर्फ सुरमा भोपाली (वय ४४, मूळ रा. मध्यप्रदेश) याचा शेतात बांधलेल्या खोलीत रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने तोंडावर डांबर खडीच्या पया दगडाने ठेचून हत्या केली. तसेच त्याच्या छातीवर भलामोठा दगडही ठेवला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.हत्या कोणी केली? का केली? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. ही घटना २९ मार्च रोजी रात्री ९ ते सकाळी ७-४५ वाजेच्या सुमारास घडली असावी. याबाबत शनिवारी, ३० मार्च रोजी सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.६३/२०२४ भादंवि कलम ३०२ प्रमाणे एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    गुन्ह्याच्या तपासासाठी जळगाव येथून श्‍वानपथक मागविण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी एका व्यक्तीला संशयित म्हणून चौकशीकामी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, मुक्ताईनगरसह जळगाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली. त्यानंतर पीएमसाठी प्रेत रवाना करण्यात आले. पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे, पीएसआय अमोल गर्जेे, देवा पाटील, यशवंत टाहाकळे व सहकारी करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.