लंडन ः वृत्तसंस्था
मानवी आयुष्य वाढवण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या अनेक देशांत संशोधनाचा स्तर वेगाने वाढत आहे. इनसाइट ॲनालिटिक्सनुसार, भलेही या क्षेत्रात संशोधन प्राथमिक अवस्थेत असले तरी दीर्घायुष्य विज्ञान क्षेत्र एक अब्जावधी डॉलरचा उद्योग होण्याच्या तयारीत आहे. हे २०३० पर्यंत १६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षांत ब्रिटन वय वाढवण्याच्या संशोधनात आघाडीची भूमिका बजावत आहे. ब्रिटनमध्ये या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अनेक स्टार्टअप आहेत. सध्या अनेक वर्षांपासून केलेल्या अभ्यासाच्या आधारावर तज्ज्ञांनी ब्रिटनमध्ये २०२० मध्ये जन्मलेल्या मुलींपैकी जवळपास ९० वर्षांपर्यंत आणि मुली जवळपास ८७ वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात पेशी जीर्णतेतील तज्ज्ञ प्रा. लिन कॉक्स यांच्यानुसार, संभाव्य रूपात भाग्यशाली होण्यासोबत तुम्ही सर्व बाबी योग्य केल्या आणि तुमच्याकडे योग्य गुणसूत्र असेल तर तुम्ही १२० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकता. ऑक्सफर्डचा एक गट पेशींना अधिक सक्षम करून ज्येष्ठांच्या रोगप्रतिकारशक्ती प्रणालीत सुधारणा आणण्याच्या पद्धतीवरही विचार करत आहे. याशिवाय पेशी निरोगी राहाव्यात हे निश्चित करून आपण दीर्घकाळ जिवंत राहण्यास मदत करण्याच्या हातखंड्यावर काम केले जात आहे मात्र संशोधनातील निष्कर्ष मानवी चाचण्या आणि क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी वापरले जाऊ शकेल हे निश्चित करणे कठिण आहे.
१२० वर्षे जगण्याची संधी
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी भाग्यवान असतात.हे भाग्य सर्वांसाठी शेअर करण्याची पद्धती शोधली जाऊ शकते. यामुळे फक्त काही लोक नव्हे तर सर्वांना १२० वर्षांपर्यंत जगायची संधी मिळेल.