Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»लाचखोर लेखापरीक्षक ठाकुर पाच लाख घेताना जाळ्यात
    क्राईम

    लाचखोर लेखापरीक्षक ठाकुर पाच लाख घेताना जाळ्यात

    SaimatBy SaimatAugust 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धुळे : प्रतिनिधी

    अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.राव्ोर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नाव्ो करून देण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना धुळे येथील सहकारी संस्थचे विशेष लेखापरीक्षक तथा संबंधित पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

    जळगाव भूविकास बँकेचे अतिरिक्त विशेष लेखा परीक्षक, धुळे येथे सहकारी संस्थाचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक म्हणून काम पाहात आहेत. छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुलातील गाळा घेण्यास उत्सुक असलेल्या तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. पतसंस्थेचा गाळा आणि गाळ्यासाठी भरण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम आपल्या नाव्ो करून देण्याची प्रशासकीय प्रक्रिया करावी, अशी विनंती अवसायक म्हणून ठाकरे यांच्याकडे केली होती.

    तत्कालीन, प्रशासक अशोक बागूल यांनी तक्रारदाराकडून संबंधित गाळ्यासाठीची सुरक्षा अनामत म्हणून तीन लाख ८५ हजार रुपये रोखीने भरून घेतले. ताबा पावती व प्रतिज्ञापत्रही लिहून देत व्यापारी गाळ्याचा ताबाही दिला. परंतु, या मोबदल्यात तत्कालीन प्रशासक बागूल यांनीही तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. या रकमेची पूर्तता झाली नाही म्हणून बागूल यांनी संस्थेची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नाव्ो वर्ग होण्याबाबतचे काम करून दिले नाही. दरम्यान, बागूल यांची बदली झाली आणि या संस्थेचे अवसायक म्हणून ठाकरे यांची नियुक्ती झाली. या खंडित प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी नव्ो अवसायक ठाकरे यांना सावदा नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करावा लागणार असल्याने तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

    ठाकरे यांनी या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. वैतागलेल्या तक्रारदाराने या संदर्भात अवसायक ठाकरेविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची सावदा येथे जाऊन खात्री केल्यावर अधिकाऱ्यांनी अवसायक तथा सहकारी संस्थेचे (प्रक्रिया) विशेष लेखापरीक्षक ठाकरे यांच्यावर कारवाईची तयारी पूर्ण केली. १७ ऑगस्टच्या रात्री धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात सापळा रचुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक हेमंत बंडागळेव, रुपाली खांडवी यांच्या पथकाने ठाकरे यांना पाच लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : विनाकारण हल्ला: मेहरुण पुलाजवळ माजी पोलीसावर प्राणघातक वार

    January 18, 2026

    Pune-Solapur : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भाविकांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

    January 18, 2026

    Jalgaon : कंडारी फाट्यावर दिलासा नसलेला अपघात: बस आणि कंटेनरची धडक, ६० वर्षीय ठार

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.