Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Breaking : रावेर ब्राऊन शुगर प्रकरणी मुख्य आरोपीला अटक
    क्राईम

    Breaking : रावेर ब्राऊन शुगर प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

    saimat teamBy saimat teamDecember 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । रावेर येथील ब्राऊन सुगर प्रकरणी मुख्य आरोपीला रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट खुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे मोठी कारवाई केली होती. याच्या अंतर्गत रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्‍हाणपुर) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते. या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्‍याने केली आहे.

    याप्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला असून परिणामी यातील रॅकेट उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : सुप्रीम कॉलनीमध्ये मराठी वाचनालय ज्ञानाचा नवा दरवाजा खुला

    March 29, 2026

    Jalgaon : अज्ञात वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू

    March 29, 2026

    Jalgaon : जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई तिघे जेरबंद

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.