साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जयपूर येथील मणिपाल विद्यापीठातील विधी विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यात स्त्री – पुरुष समानता विषयी विचारमंथन झाले.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे डॉ. साजिदा शेख, डॉ. विजेता सिंग आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन परिषद सदस्य आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी उपस्थित होते.
या वेळी डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चव्हाण, ग्रंथपाल अमिता वराडे, प्रा. बी. एस. पाटील, डॉ. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे उपस्थित होते.
डॉ.अशोक राणे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात संविधानिक मूल्य आणि कायदेविषयक शिक्षण या संदर्भात मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी के.सी.ई सोसायटी, तसेच विधी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा मांडला. डॉ. रेखा पाहूजा यांनी प्रमुख अतिथी डॉ. विजयालक्ष्मी यांचा परिचय करुन दिला. डॉ. विजेता सिंग यांनी आभार मानले.
समान वागणुकीची अपेक्षा
डॉ. विजयालक्ष्मी शर्मा यांनी ‘फौजदारी न्यायव्यवस्थेतील लिंगभाव संवेदनशीलता’ या विषयावर मार्गदर्शन केले. विशाखा केस, निर्भया इत्यादी उदाहरणासह स्त्री-पुरुषच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून समान वागणुकीची अपेक्षा व्यक्त केली.