आरोग्य शिबिर,भोजनदान,पुस्तक वाटपाचा उपक्रम
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभेचे मलकापूर शहराध्यक्ष आनंद तायडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘द पीपल सामाजिक बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्यातर्फे भाविकांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. तसेच समाजाच्या बौद्धिक उन्नतीसाठी बुद्धा आणि त्याचा धम्म, भारतीय संविधान, संविधान प्रस्ताविका तसेच बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि विविध महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे मोठ्या प्रमाणावर मोफत वाटप करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत “द पीपल्स बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमर कुमार तायडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षीही त्यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. त्यानंतर संकल्प नेशनल मेडिकल रिसर्च ॲण्ड सोशल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर घेण्यात आले.भव्य प्रमाणात भोजनदान व पुस्तक वाटपाचा उपक्रम पार पडला.
या उपक्रमासाठी भवन्तु सब मंगल सामाजिक संस्थेचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमादरम्यान बापुसाहेब भोसले, मिलिंद साळवे, करन झणके, सिद्धार्थ गायकवाड, प्रमोद तायडे, आशिष पवार, निशात ठाकरे, आदर्श सुरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
