चाळीसगावला रोटरी क्लब, पोलीस विभागातर्फे रक्तदान शिबिर

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एस.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक शहर विभाग संदीप पाटील, पोलीस निरीक्षक ग्रामीण विभाग ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रक्तदानासारखे महान कार्य केले.

रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष ब्रिजेश (भैय्या) पाटील, सचिव चंद्रेश लोडाया, प्रकल्प प्रमुख किरण देशमुख, प्रीतेश कटारिया, निलेश शर्मा, अनिल मालपुरे, विवेक येवले, संजय चौधरी, पियुष सोनगिरे, किशोर गवळी, हिम्मत पटेल, संजय अग्रावत, चेतन वर्मा, मोहीत बजाज, अजय गेमनाणी, निळकंठ पाटील, रोशन ताथेड, सुभाष जाधव, राजेंद्र कटारिया यांच्यासह रोटरी परिवारातील महिला ममता शर्मा, प्रतिभा पाटील, श्रद्धा महाजन, मानसी कासार अशा सर्व रोटरी परिवारातील सदस्यांनी रक्तदानाच्या महान कार्यास योगदान दिले.

उपक्रमासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे संदीप पाटील यांनी हिरीरीने भाग घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करून रक्तदान करून घेतले. यशस्वीतेसाठी जीवनसुरभी ब्लड बँकेने सहकार्य केले. तसेच प्रत्येक रक्तदात्याचा विमाही काढण्यात आला. पोलीस विभाग आणि रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे सचिव चंद्रेश लोडाया यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here