Sub-District Hospital In Shirpur : शिरपुरातील उपजिल्हा रुग्णालयाला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

0
8

भेटीत वैद्यकीय अधीक्षकांशी केली विविध समस्यांवर चर्चा

साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :

येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पावरा यांची भाजपाचे धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडीचे सरपंच तथा भाजपा माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे यांनी नुकतीच भेट घेऊन रुग्णालयातील विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील एमडी, एमएस सर्जन, सीटी स्कॅन विभाग आदींची माहिती जाणून घेतली.

रुग्णालयात स्वतःची ब्लड बँक असणे, रुग्णांसाठी स्वच्छ व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रुग्णालयातील कर्मचारी व इतर महिलांसाठी शौचालय बांधणे असणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. धुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन माजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत, माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे शिरपूर रुग्णालयात एक्स-रे व सीटी स्कॅन मशिन मिळण्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. रुग्णालयात एक्स-रे व सीटी स्कॅन मशिन आल्याने अरुण धोबी यांनी आनंद झाल्याचे सांगितले.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले स्वागत

यावेळी रुग्णालयातील सीटी स्कॅन विभागातील विशेष माहिती जाणून घेतली. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय शासकीय रूग्णांसाठी मोफत तसेच प्रायव्हेट रुग्णांसाठी शासकीय दरात सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन दिले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी सीटी स्कॅन विभागाचे अक्षय भूते, प्रतिक म्हसे, ईश्वर सैंदाणे, नितीन, निलेश, प्रशांत भूपेंद्र, मितांशी सिस्टर आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सीटी स्कॅन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी स्वागत करुन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here