डॉ. मुखर्जींच्या विचारांसह राष्ट्रभक्तीला उपस्थित मान्यवरांनी केले नमन
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
जनसंघाचे संस्थापक, महान देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी भाजपातर्फे शिरपूर नगरपालिकेच्या डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात डॉ. मुखर्जींच्या तैलचित्र प्रतिमेस आ.काशिराम पावरा, धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते माल्यार्पण करून त्यांच्या अतुलनीय योगदानाचे आदराने स्मरण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुखर्जींच्या विचारांसह त्यांच्या राष्ट्रभक्तीला नमन केले.
देशाच्या एकात्मतेसाठी डॉ. मुखर्जी यांनी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान हे राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. ‘एक देश, एक विधान, एक निशान व एक प्रधान’ अशा त्यांच्या घोषणेने तत्कालीन परिस्थितीत देशाची एकता टिकविण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, जे आजही राष्ट्र निर्माणासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ.काशिराम पावरा यांनी केले. यावेळी धुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनीही मनोगत व्यक्त करुन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला धुळे जि.प.चे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, न.पा.चे सीओ प्रशांत सरोदे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई, अनु. जातीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहराध्यक्ष विक्की चौधरी, शहर उपाध्यक्ष मनोज राजपूत, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष प्रकाश गुरव, पं.स.चे माजी सदस्य यतीश सोनवणे, पत्रकार राजेंद्र जाधव, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष नंदु माळी, युवा कार्यकर्ता परेश पाटील, योगेश पाटील, देवीदास पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.