समितीच्या सदस्य सचिवपदी तहसिलदारांची नियुक्ती
साईमत/साक्री/प्रतिनिधी :
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, पोषण आहार सुधारणा तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा प्रारंभ केला आहे. योजनेचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. त्यात सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी साक्रीतील भाजपाच्या नगरसेविका जयश्री विनोदकुमार पगारीया यांची निवड केली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी साक्रीच्या आ.मंजुळा गावित तसेच सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश सोनवणे यांची अशासकीय निवड केली आहे. साक्री आणि पिंपळनेर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प (वरिष्ठ) अधिकारी, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांचा समावेश आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नुकतीच केली आहे.
यांनी केले अभिनंदन
समितीच्या सदस्यपदी जयश्री पगारीया यांची निवड झाल्याबद्दल यांचे धुळे जि. प. कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती तथा भाजपाचे युवा नेते हर्षवर्धनजी दहिते, साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.नानासाहेब बन्सीलाल बाविस्कर, साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे, साक्री नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गिते, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, महीर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश सरक, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन प्रदीपकुमार नांद्रे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, मुन्ना देवरे, कुंदन देवरे, दिनेश सोनवणे, सुधीर अकलाडे, प्रवीण देवरे तसेच साक्री नगरपंचायतीच्या सर्व सभापती तथा नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे.