साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
‘खान्देशातील काव्यनिर्मितीत कुसुमताई चौधरी यांचे योगदान’ विषयावर कवयित्री संध्या भोळे यांनी कुसुमताई यांच्या कविता खान्देशातील समाज संस्कृती दर्शन घडवितात. यावेळी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. ‘कमलगंध’ व ‘मधुगंध’ कुसुमताई यांच्या काव्य संग्रहाचा आढावा घेतला. तसेच संध्या भोळे यांनी आपल्या ‘जावे गुंफित अक्षरे’ यातील ‘माही भाषा माही माय’ या स्वरचित काव्यगित सादर केले. डॉ.अरविंद चौधरी लिखित ‘काय गतका फुटला…!’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे व प्राचार्य डॉ. अरूणा चौधरी, विभाग प्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुणा चौधरी होत्या. त्यांनी कुसुमताई यांचे व्यक्तित्व आणि साहित्य त्यातील त्यांच्या संवेदनशिलतेचे, प्रतिभेचे प्रभावी दर्शन घडवितात, अश्या कवितांचा आढावा घेतला. ‘कोण तू’,‘देवप्रिती’ व ‘असे क्षण आले गेले’ या कवितांचे सादरीकरण करताना त्यांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले, असे दुर्मिळ नाते पहावयास मिळाले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर. बी. वाघुळदे, श्रीमती रोहिणी चौधरी, सातपुडा विकास मंडळाचे श्री.झांबरे, उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले, मराठी विभाग प्रमुख मनोहर सुरवाडे, डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.विजय तायडे, प्रा. प्रिया बारी, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. राजश्री नेमाडे, डॉ.कल्पना पाटील यांच्यासह सर्व मराठीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. उन्नती चौधरी यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. मनोहर सुरवाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन तथा आभार डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी मानले.