जागतिक शाकाहार दिनानिमित्त श्री जैन जैन युवा फाउंडेशन तर्फे बाइक रैली

0
35

साईमत जळगाव प्रतिनिधी

शाकाहार हाच शुद्ध आहार’ असा नारा देत शहरात प्रमुख मार्गांवर जागतिक शाकाहार दिनानिमित्त श्री जैन युवा फाऊंडेशन तर्फे शाकाहार रॅली रविवारी (दि. १) सकाळी काढण्यात आली. रतनलाल सी. बाफना प्रायोजित या रॅलीत जैन युवा फाऊंडेशन व जय गुरुदेव ग्रुप चे सदस्य तथा विविध संघटनेच्या व विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

आयोजक श्री जैन युवा फाउंडेशनचे रॅली काढण्याचे हे सहावे वर्ष होते. प्रत्येकाने शुद्ध व सकस शाकाहार घ्यावा. दीर्घायुष्यासाठी शाकाहार महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी प्रचार-प्रसार रॅलीतून सांगण्यात आले. सागर पार्क मैदानावर रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात झाली. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी ,कस्तुरचंद बाफना, आमदार राजू मामा भोळे, मनीष जैन, नगरसेवक बंटी जोशी, विरेंद्र खडके, तसेच समाजात बाधावांनी रॅलीत सहभाग घेतला.

श्री जैन युवा फाऊंडेशन द्वारे आयोजित शाकाहार दिना निमित्त निबंध स्पर्धा व विविध राज्याची वेशभूषा स्पर्धा चे आयोजन केले होते,त्यास चांगला प्रतिसाद मिळाला,निबंध स्पर्धेस विविध शाळेच्या विद्यार्थानी सहभाग घेतला, विविध राज्याच्या वेशभूषा स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला समाजातील अनेक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
सागर पार्क येथे रॅली समाप्त करीत शाकाहार सभा घेण्यात आली. या वेळी शाकाहार चे महत्व सांगत अरुणभाई गुजराथी ,कस्तुरचंद बाफना ,राजू मामा भोळे , मनीष जैन, पारस राका, स्वरूप लुंकड यांनी सभेला उद्बोधित केले. मंचावर फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर राका, सचिव तेजस जैन, व कोषाधक्ष्य शैलेश गांधी उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी शाकाहार दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्याना मान्यवरांनी पारितोषिक देऊन गौरविले.

या रॅलीला यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख अमोल श्रीश्रीमाळ, रितेश छोरिया, प्रणव मेहता, अंकित जैन, दिनेश राका, मनोज लोढा, प्रविण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, दर्शन टाटिया, प्रविण छाजेड़, सौरभ कोठारी, जयेश ललवाणी, राहुल बांठिया, पियूष संघवी, आनंद चंदिवाल, यतिन राका, सुशिल छाजेड़, अनूप जैन, विनय गांधी, अमित कोठारी, संदिप सुराणा, शैलेश कटरिया, गौरव पांनगरिया, जिनेश सोगठी, धीरज जैन, आशीष कांकरिया, जितेंद्र लोढा, दिनेश बाफना, आनंद रेदासनी, स्नेहिल संघवी तसेच श्री जैन युवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here