संत, महंतांनी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिले आशीर्वाद
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील झुरखेडा येथे येत्या २४ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या प.पु. पंडीत धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या मुखातून श्री हनुमंत कथा व दिव्य दरबार कथेचा भुमिपूजन सोहळा महामंडलेश्वर १००८ हंसानंद तिर्थ महाराज (कपीलेश्वर), स्वामी अव्दैतानंदजी चंद्रकिरण सरस्वती (महर्षी कण्व आश्रम कानळदा), महामंडलेश्वर प.पू. महंत स्वामी नारायण (गादीपती, रामेश्वर), महामंडलेश्वर जर्नादन हरीजी महाराज (फैजपूर), प. पु. बालयोगी स्वामी राजेश्वरानंद सरस्वती (शिव-पार्वती आश्रव गादीपती, उत्तराखंड), महंत माणिकलाल पाण्डेय, दग्धेश्वनाथ मंदिर (अध्यक्ष श्री क्षेत्र, रूद्रकाशी), कथावाचक शुभम कृष्ण दुबे (इंदौर हातोड), यज्ञाचार्य पंडीत मनिष शर्मा (इंदौर), ह.भ.प. प्रेममुर्ती सदाशिवजी महाराज (साक्री), गुरूवर्य घनश्याम महाराज (जळगाव) यांच्या हस्ते व तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक व पावित्र विधी करत नुकतेच झाले.
यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाला व आयोजकांना शुभेच्छा देत कथेसाठी यथाशक्ती हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. आयोजकांतर्फे मनोज पाटील म्हणाले की, बागेश्वरधाम सरकारतर्फे १३ तारखेला भुमिपूजन करण्यात यावे, असे निर्देश आले होते. त्यांच्या आदेशाने संत, महंतांच्या हस्ते हा भुमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा एकट्याचा नसुन पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक सनातन व हिंदूत्व जाणणाऱ्या युवा पिढीचा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने युवापिढी व बागेश्वर संप्रदायातील सनातन धर्म जोपासणाऱ्या प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे भावनिक आवाहन केले. सर्व संत, महंतांनी हा सोहळा यशस्वीरित्या पार पडेल, असे आशीर्वाद दिले.
याप्रसंगी मनिष जैन (माजी आमदार), सुरज सुनील झंवर (युवा उद्योजक, पाळधी), कुलभास्कर सिंघ (रेमंड लाईफ स्टाईल डेप्युटी जनरल मॅनेजर), सुशीलकुमार बाफना (आरसी बाफना ज्वेलर्स), राजेश अरूण चौधरी (संचालक सनशाईन ॲग्री, जळगाव), मनोज पाटील (अध्यक्ष- त्रिमुर्ती कॉलेज, पाळधी, जळगाव), पी.सी. पाटील (वाघळुद बु.।।), चंद्रकांत गुलाबराव पाटील (अध्यक्ष, अमर संस्था, चोपडा), सुनील पाटील (सचिव त्रिमुर्ती कॉलेज पाळधी, जळगाव), रामेश्वर सोमाणी (जयश्री हॉटेल), राजू दोषी (जळगाव), राजू बांगर (जळगाव) तसेच आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील शेतकरी, दानशूर व्यक्ती, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
ही कथा अवघ्या महाराष्ट्रात चर्चिली जावी, विशिष्ठ अचुक, चौकस नियोजन असलेली आपल्या गावाचा नावलौकिक व्हावा, असा मानस असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील तर संदीप पंजाबराव पाटील यांनी आभार मानले.