धनाजी नाना महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

0
6

महाविद्यालयाचा आलेख असाच चढता राहील

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

येथील धनाजी नाना महाविद्यालयाला जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित अव्यवसायिक महाविद्यालय गटातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर झाला आहे. यानिमित्त संस्थाध्यक्ष शिरीष चौधरी, व्यवस्थापन व नियामक मंडळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांनी पुरस्काराचे श्रेय स्थापनेपासून आजतागायत महाविद्यालयाच्या जडणघडणीत मौल्यवान भूमिका पार पाडणाऱ्या सर्व व्यवस्थापन, प्रशासन, प्राध्यापक, माजी प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्टेक होल्डर्स यांना दिले आहे. महाविद्यालयाचा आलेख असाच चढता राहील, असा आशावादही व्यक्त केला.

या पुरस्कारामुळे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. आगामी काळात विद्यापीठ परिक्षेत्रात नव्हे राज्य व राष्ट्रीय पातळीवर ही महाविद्यालयामार्फत विविध उपक्रम आयोजित केले जातील, असा मनोदय व्यक्त केला आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी व इतर अधिकारी, अध्यक्ष तथा आ.शिरीष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकर चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, सचिव प्रा.मुरलीधर फिरके, व्हा.चेअरमन किशोर चौधरी, सहसचिव प्रा.नंदकुमार भंगाळे, सदस्य माजी प्राचार्य डॉ.जी.पी.पाटील, संजय चौधरी, सर्व संचालक यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here