कै.आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाले चे तिसरे पुष्प
साईमत/पहूर, ता.जामनेर /प्रतिनिधी :
आनंद हा मनात असतो आणि परिस्थिती बदलण्याऐवजी आपल्या विचारांची दिशा बदलल्यास आनंद मिळतो. इतरांशी तुलना केल्यास असमाधान वाढते, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास समाधान वाढते. वेळेचे नियोजन, नियमित वाचन, व्यायाम आणि चांगली संगत यासारख्या सकारात्मक सवयी आनंद वाढवतात. दुसऱ्यांच्या उपयोगी होणे, सेवा आणि सहानुभूती यांमुळेही आनंद प्राप्त होतो. तसेच, स्पष्ट ध्येय असलेले अर्थपूर्ण जीवन जीवनाला दिशा देऊन आनंद टिकवते, असे व्याख्यानात अशोक देशमुख यांनी सांगितले.
शेंदुर्णी येथील कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख (पुणे) यांनी “आनंदाची गुरुकिल्ली” या विषयावर सादर केले. सर्वप्रथम सद्गुरू हरिप्रसाद महाराज व कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेचे सहसचिव मा. यू.यू. पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.अध्यक्षस्थान शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी भूषविले.
याप्रसंगी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटीचे चेअरमन संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड, सरोजिनीताई गरुड, शांताराम गुजर, प्रकाश झंवर, प्रा.सुनिल गरुड, प्राचार्य डॉ.संजय भोळे, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आंबेजोगाईचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख, प्राचार्य आर.एस.चौधरी तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भूषण पाटील यांनी केले तर आभार प्रा.एस.आर. पाटील यांनी मानले.
