Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात गुरुवारी १९० वर्षांची परंपरा लाभलेला बालाजी रथोत्सव
    पाचोरा

    पाचोऱ्यात गुरुवारी १९० वर्षांची परंपरा लाभलेला बालाजी रथोत्सव

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 12, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रथाच्या पुजेचा मान मिळणार पाटील परिवारातील नवविवाहित दाम्पत्याला

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

    येथील १९० वर्षांची परंपरा लाभलेला श्री बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुध्द चतुदर्शी म्हणजे वैकुंठ चतुदर्शीला असतो. यावर्षी रथयात्रा आणि मिरवणूक उत्सव गुरुवारी, १४ नोहेंबर रोजी आयोजित केला आहे. श्री बालाजी महाराज यांची मूर्ती रथात बसवून ढोल-ताशे, लेझीम यांच्या निनादात ही मिरवणूक रथगल्ली, विठ्ठल मंदीर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड पुन्हा रथगल्ली अशी काढली जाते. ही मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरु होऊन ती रात्री दहा वाजता संपते. बालाजी महाराजांचा रथ हा दोर बांधुन लोकसमुहाद्वारे ‘श्री बालाजी महाराज की जय’ या घोषणेच्या निनादात ओढला जातो.

    मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यानिमित्त गांधीचौक, जामनेर रोड, शिवाजी चौक या भागात मोठी यात्रा भरते. श्री बालाजी महारांजाना प्रसाद म्हणून केळी व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. रथ मार्गात भाविक रथाची पूजा करतात. पाचोरा येथे श्री बालाजी मंदीर व रथ तयार करण्यासाठी काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगाव राजा येथील पंडीत व महंतांना बोलावून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन रथाची यात्रा व मिरवणूक उत्सव सुरु करण्यात आला. तेव्हापासून हा उत्सव आजतागायत उत्साहासह आनंदात सुरु आहे.

    कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला रथ

    श्री बालाजी महारांजाचा रथ हा त्यावेळचे पाचोरा, पारोळा व नगरदेवळा येथील कुशल कारागीरांनी सागवानी लाकडापासून तयार केला आहे.रथाची उंची ३० फुट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. रथाच्या दिवशी रथाच्यावर कळस ठेवला जातो तर अग्रभागी लाकडी घोडे, सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसविली जाते. त्याच्या दोन्ही बाजुस चोपदार यांच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात. तसेच मागील बाजुस राक्षसाच्या मुर्त्या उभ्या केल्या जातात. पुढील भागी कळसाच्या खाली परी व श्री हनुमानच्या मुर्त्या बसविल्या जातात. रथ मिरवणुकीच्या दिवशी रथाच्या चारही बाजुस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, उस, झेंडुच्या फुलांच्या माळा लावून रथ आकर्षक व सुशोभित केला जातो. तसेच विजेची रोषणाई केली जाते. रथ सजविण्याच्या आधी तीन दिवस त्यास पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ केले जाते. संपूर्ण रथास तेलपाणी लावले जाते. त्यामुळे रथ चमकदार दिसतो.

    ‘कोल्ह्यांचा रथ’ म्हणून ओळख

    रथयात्रा मिरवणुकीच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजता श्री बालाजी महाराज यांची गावातून पालखी काढली जाते. गावात घराघरातून पालखीची पूजा केली जाते. तसेच श्री बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले जाते. रथयात्रेचे आयोजन श्री बालाजी मंदीर संस्थान, पाचोरा यांच्यामार्फत करण्यात येवून रथाची संपूर्ण देखभाल व व्यवस्था सयाजी पाटील परिवारामार्फत केली जाते. सयाजी पाटील परिवार हे मुळचे कोल्हापूरचे. परंतु कालांतराने ग्रामीण भाषेत ‘कोल्हापूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘कोल्हे’ असा झाला. ‘कोल्ह्यांचा रथ’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

    पाटील घराण्यास देवाचे चोपदाराचा मान

    रथ मिरवणुकीपूर्वी रथाची पूजा व धार्मिक विधी केला जातो. पुजेचा मान पाटील परिवारातील नवविवाहित जोडप्यास दिला जातो. यावर्षी अल्पेश पाटील व प्रणाली पाटील यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजा केली जाणार आहे. धार्मिक विधी व दैनंदिन पूजा अर्चा करण्याचा मान हा प्रमोद जोशी यांच्याकडे राहील. पाचोरा येथील के राघो गणपत पाटील यांच्या घराण्यास देवाचे चोपदाराचा मान आहे. हल्ली त्यांचे नातु प्रा.गिरीष पाटील हे पारंपरिक पोषाखात चोपदाराचे काम पाहतात.

    रथापुढे पारंपरिक पध्दतीने लावल्या जातात ‘मशाली’

    रथ थांबविणे, वळविणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. मोगरी लावण्याचे महत्त्वाचे आणि जोखमीचे काम अशोक वाडेकर आणि सुभाष सोनवणे तसेच त्यांचा सर्व परिवार आनंदाने सहभागी होऊन पार पाडतात. रथापुढे पारंपरिक पध्दतीने मशाल लावल्या जातात. हे काम परशुराम अहिरे व त्याचे सहकारी नितीन शिरसाठ यांना दिले आहे. यंदाही रथयात्रेची मिरवणूक सयाजी पाटील परिवार पाचोरा, मित्र परिवार तसेच पाचोरा शहरातील सर्व भाविक, भक्तगण, नागरिक यांच्या अथक परिश्रमाने आनंदासह उत्साहाने पार पाडली जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.