पहुरमधील ५४ भाविकांची अयोध्या दर्शन यात्रा उत्साहात

0
16

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा घेतला लाभ, जिल्ह्यातून ८०० यात्रेकरूंचा सहभाग

साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८०० यात्रेकरूंची लाॕटरी पध्दतीने निवड झाली होती. योजनेसाठी जिल्ह्यातून एक हजार १७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात पहूर येथील ५४ भाविकांची निवड झाली. जामनेर तालुक्यातील १०५ भाविक अयोध्या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते. विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे ८०० भाविकांना घेऊन ३० सप्टेंबर रोजी अयोध्येकडे रवाना झाली होती.

भाविकांनी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीचे दर्शन घेतले. यासह हनुमान गढी, दशरथ महल, कनक महल, लता मंगेशकर चौक अशा स्थळांना भेटी देऊन सायंकाळी शरयू नदीत स्नान करून शरयू मातेच्या महाआरतीत सहभाग नोंदविला.

एक दिवसाच्या मुक्कामानंतर ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ जळगावकडे परतीच्या प्रवासाला लागून जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. अयोध्या दर्शनाचा लाभ मिळाल्याने यात्रेकरूंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

यात्रेकरूंचा प्रवास सुखरूप झाल्याने चेहऱ्यावर झळकला आनंद

अयोध्या दर्शन यात्रा अविस्मरणीय झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. अयोध्या दर्शन घेऊन आलेल्या सर्व भाविकांना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभाग व भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारा रामलल्लाच्या अयोध्या मंदिराच्या प्रतिमा तसेच जी.एम.फाउंडेशन, जळगाव यांच्याकडून प्रभू श्रीरामाचा फोटो असलेल्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. यात्रेकरूंचा प्रवास सुखरूप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here