प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले.
साईमत/यावल /प्रतिनिधी :
तालुक्यातील सांगवी बु.येथे महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित विशेष जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. शिबिर फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीनकुमार पाटील व सहाय्यक अभियंता राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिरात ग्रामस्थांना वीज बिलावरील नाव बदल प्रक्रिया तसेच प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिर यशस्वितेसाठी महावितरणचे सुरेश मोरे, महेंद्र महाजन, हर्षवर्धन तळेले,जुबेर, योगेश बारी, गोविंदा भास्कर, सचिन चौधरी, स्वाती मोरे, ऋषिकेश आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी सांगवी बु.चे प्रभारी सरपंच अतुल फिरके, माजी सरपंच विकास धांडे व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
जनजागृती शिबिरामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून,सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज खर्चात लक्षणीय बचत होईल,असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
