साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील स्व.धृपदाबाई यादव सरोदे शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे कृतज्ञता दिन म्हणून गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील कार्यरत उपक्रमशील शिक्षक विलास अरुण निकम यांना लोहारा गावाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुलाल बोरसे, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित व्हा.चेअरमन भीमराव शेळके, कृषीभूषण विश्वासराव शेळके, लोहारा हायस्कुलचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, ए.ए.पटेल, महेंद्र शेळके, कृष्णराव शेळके, दीपक पवार, चंद्रकांत पाटील, कैलास यादव सरोदे, सुभाष यादव सरोदे गावातील प्रतिष्ठित मंडळी, पत्रकार यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला. त्यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास करणे, मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी झटत असताना त्यांच्या कार्याची दखल कैलास यादव सरोदे, सुभाष यादव सरोदे यांनी घेतली. त्यांच्या आईच्या सहाव्या पुण्यसमरण दिनानिमित्त कृतज्ञता दिन म्हणून विलास निकम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.