नॅक मूल्यांकनात नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला ‘बी’ श्रेणी प्रदान

0
15

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्यावतीने नुकतीच ‘बी’ श्रेणी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, यासाठी पाच वर्षातून एकवेळा नॅक समितीच्यावतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. नॅक मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान नॅक बेंगलुरु यांच्यातर्फे तीन सदस्य समितीत अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा, प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्‍वविद्यालय सागर (म.प्र.), समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू या मूल्यांकन समितीने नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नुकतीच भेट देऊन विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची तपासणी करून मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली.

मूल्यांकन प्रक्रियेत मेंटॉर डॉ. जयेश गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रभाकर चौधरी, नॅक समन्वयक प्रा.डॉ. नयना वाणी, प्रा.डॉ. नरेंद्र पाचपांडे. प्रा.डॉ. अंजली जोशी, प्रा.डॉ. जितेश चव्हाण, प्रा. उषा पाटील, प्रा.डॉ. सुनंदा तायडे, प्रा.कैलाश देवरे तसेच सर्व प्राध्यापकांनी प्रत्येक क्रायटेरियावर सखोल अभ्यास व मार्गदर्शन घेऊन आवश्‍यक माहिती संकलित केली. कार्यालयीन कर्मचारी अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, ग्रंथपाल गिरीश पाटील यांनी कार्यकुशलतेने कार्यालयीन कामकाज सांभाळले. राजेंद्र वाघ, विनोद सोनवणे, सोपान पाटील, चेतन थोरात यांच्यासह आयटीआय, आर्मी स्कुल, संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन मूल्यांकन प्रक्रियेस सामोरे गेले.

मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच पालक वर्ग व इतर सर्व संबंधित घटकांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा.श्‍याम पवार यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here