दोन नव्या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांची आज सुरूवात जळगाव ( प्रतिनिधी) एमजीआर चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी, तर पुण्यातील हडपसर-जोधपूर एक्सप्रेस या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नव्या या ट्रेनचा शुभारंभ होत आहे. यातील एक गाडी जळगाव आणि भुसावळमार्गे धावणार आहे. गाडी क्र २०६२५ एमजीआर चेन्नई ते भगत की कोठी, जोधपूर (राजस्थान) पर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावेल. २०६२५ चेन्नई ते जोधपूर (भगत की कोठी) ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी चेन्नईहून संध्याकाळी ७:४५ वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता जोधपूरला पोहोचेल. २०६२६ भगत की कोठी (जोधपूर) ते चेन्नई…
Author: Vikas Patil
उद्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज जळगाव ( प्रतिनिधी) सध्या जळगावसह राज्यात उन्हाचा कहर असून हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असल्याने जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ४ ते ९ मेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे जळगावकरांसाठी पुढील आठवडा पावसाचाच राहण्याची शक्यता आहे. जळगावकरांसाठी मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी तापमान राहणार असले, तरी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक ४४ अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिम-उत्तर वाऱ्यांमुळे तापमानाची तीव्रता वाढली आहे. जळगावचे तापमान शुक्रवारी ४३.९ अंशांवर पोहोचले. या हंगामात…
१२ लाख ७५ हजारांच्या बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त चोपडा ( प्रतिनिधी) तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात २ मेरोजी दुपारी शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे बोगस कापसाचे बियाणे आढळल्याने व दहा दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. जीवनलाल चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाला तावसे बुद्रुक शिवारात बोगस बियाण्यांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कृषी विभागाने कारवाई करत जीवनलाल चौधरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झाकून ठेवलेला १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा बोगस कापसाचा साठा जप्त केला. या…
आदिवासी सेवा मंडळाचा ११ मे रोजी सामूहिक विवाह सोहळा सावदा ( प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील आदिवासी समाजात सलोखा आणि एकात्मतेचे प्रतीक ठरणारा आसेमं आदिवासी तडवी भील सामूहिक विवाह सोहळा यंदा ११ मे रोजी सावदा येथे पार पडणार आहे. सलग 27 वर्षांपासून (कोरोनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता) यशस्वीरित्या आयोजित होत असलेला हा विवाह सोहळा यंदा 28व्या वर्षात पदार्पण करतो आहे. राज्यभरातील आदिवासी समाजातील नवदांपत्यांच्या जीवनाला नवीन सुरुवात देणारा हा सोहळा, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरतो आहे. आसेमं (आदिवासी सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत या सोहळ्याच्या माध्यमातून 1830 जोडप्यांचे विवाह पार पडले संस्था वधू-वरांना कोणतीही वर्गणी किंवा देणगी न घेता विवाहबंधनात…
केस, नखांच्या गळतीनंतर आता थकवा, चिडखोरपणाचा त्रास बुलढाणा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यात डिसेंबर पासून नागरिकांना अचानक केसगळतीचा त्रास सुरू झाला होता नंतर तीन महिन्यानंतर याच रुग्णांची नखं विदृप होऊन गळण्याचे प्रमाण वाढलं होतं. आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुना सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. केस गळती समोर आल्यानंतर संशोधन संस्था आयसीएमआरच्या पथकाने दौरा करून नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर…
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विकास खात्याचे ७४५ कोटी वळवले ; संजय शिरसाट संतापले मुंबई (प्रतिनिधी)- महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला निधी मिळवताना दमछाक होत आहे. दोन कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले. काल हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त…
कोणी कुठेही गेले तरी, मी शरद पवारांबरोबर- एकनाथ खडसे जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि तीन आमदार तसेच बरेच पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले असताना, कोणी कुठेही गेले तरी मी शरद पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात एकेकाळी दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत वाताहात झाली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने, पक्षाचे उरलेसुरले अवसान गळून पडले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्यासह नवीन उभारी…
आता पाकिस्तानातून आयातीवरही बंदी नवी दिल्ली (न्युज नेटवर्क )- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कडक कारवाईसाठी पडद्यामागून तयारी सुरु असली, तरी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने म्हटले आहे की ही बंदी तत्काळ लागू होईल. सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आली आहे. कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या निर्यात क्षेत्राला दणका बसणार आहे. सिमेंट, कापड आणि कृषी उत्पादनांसाठी ते…
नाशिक – कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करा नाशिक (प्रतिनिधी ) – नाशिकमध्ये पन्नास हजारहून अधिक बंगाली परिवार राहत असून त्यांना त्यांचे मूळ गाव कोलकत्ता तसेच पश्चिम बंगालमधील विविध शहरांना जाण्यासाठी नाशिक ते कोलकत्ता थेट हवाई सेवा सुरू करावी मुंबई कोलकता दुरांतो एक्सप्रेसला नाशिकमध्ये थांबा द्यावा अशा विनंतीचे निवेदन बंगाली अड्डा या बंगाली समाजाच्या नाशिकमधील संस्थेतर्फे खा . राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले. बंगाली अड्डाचे अध्यक्ष डॉ . संदीप रॉय म्हणाले की, नाशिकहून कोलकत्ता ला जाण्यासाठी थेट हवाईसेवा असावी अशी विनंती इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांना याआधी करण्यात आली आहे . या विनंतीवर इंडिगो आणि एयर इंडिया सकारात्मक…
अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल जळगाव (प्रतिनिधी )– कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्स (सीआयएससीई) चा दहावी व बारावी निकाल जाहिर झाले. अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२ वीत क्रिषा राठोड तर दहावीत वेद भुसकाडे प्रथम आले आहेत. क्रिषा राठोड ९५टक्के गुणांसह पहिली आली आहे. आरोही परांजपे ९३.२५ टक्के गुणांसह द्वितीय तर शाल्मली अलमन ९२.२५ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ९० टक्यांच्यावर ६ तर ८० ते ९० टक्क्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयसीएसई (दहावी) मध्ये प्रथम आलेला वेद भुसकाडे याला ९६.८० टक्के गुण प्राप्त झाले…