पत्नीची हत्या; वेल्हाळा शिवारातून पती फरार भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वेल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ मार्चरोजी पहाटे समोर आली असून संशयित आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ ( जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामासाठी आले. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज हे चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरात पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. अजीज याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज रात्री…
Author: Vikas Patil
पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांकडे तक्रार पाचोरा (प्रतिनिधी)- अनेक वर्षांपासून पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची होत असलेली दुरावस्था बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष दिपक भोई यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास आणुन दिले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी यासंदर्भात ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. ना. हसन मुश्रीफ यांनी या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासित केले आहे. पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाची वाट पकडावी लागत आहे. दुरुस्ती होऊन सुविधा उपलब्ध होणे गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
पाचोरा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक, इफ्तार पार्टी पाचोरा ( प्रतिनिधी)- रमजाननिमित्त पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये २२ मार्चरोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस अधिकारी आणि मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पो.नि. अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोउनि परशुराम दळवी, पोउनि योगेश गणगे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील उपस्थित होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभाग घेतला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सचिव शेख इरफान मन्यार, अजहर खान, शेख इस्माईल शेख फकिरा, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी रमजान महिन्यात सामाजिक ऐक्य…
महादेव मंदिरातील चोरीच्या तपासात पोलिसांनी पाळत ठेवून चोरांना ‘ भोळे’ ठरवले ! भडगाव (प्रतिनिधी )- भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महादेव मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी भडगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवून चोरी उघडकीस आणली आहे. आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी आणि मिथुनसिंग मायासिंग बावरी यांना अटक करण्यात आली असून, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारी रोजी कजगाव येथील महादेव मंदिरात चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिरातील १५ हजार रुपयांचे पंचधातूचे वस्त्र, ५ हजार रुपयांचा पंचधातूचा नाग आणि ५ हजार रुपयांचे पंचधातूचे त्रिशूल लंपास केले. २१ मार्च रोजी भास्करनगरमधील महादेव मंदिरात चोरी करून ५,००० रुपयांची रोकड व ३ हजार रुपयांचे…
पाचोऱ्याच्या लोकन्यायालयात ४ कोटी १८ लाखांची वसुली पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या न्यायालयाचे अध्यक्षस्थान प्र. अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांनी भूषविले. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे, तसेच द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील १६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २ कोटी ४ लाख १४ हजार ५८३ रुपयांची वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९२ प्रकरणे निकाली निघून २ कोटी १४ लाख २६ हजार ८९२…
भडगावच्या लोक अदालतीत ६३ वाद निकाली भडगाव (प्रतिनिधी)- दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, तालुका विधी सेवा समिती भडगाव आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकन्यायालय प्रक्रिया पार पडली. या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यावर भर देण्यात आला. ६३ वाद निकाली निघाले. या लोकन्यायालयात 28 प्रलंबित आणि 35 वादपूर्व प्रकरणे असा एकूण 63 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ४४ लाख १३० रुपये रकमेची तडजोड करण्यात आली. लोक अदालतीच्या पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती व्ही. एस. मोरे (दिवाणी न्यायाधीश, क स्तर) आणि पॅनल सदस्य…
रावेर पोलिस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी रावेर (प्रतिनिधी )- रावेर पोलिस स्टेशनतर्फे सामाजिक ऐक्याच्या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शहीद अब्दुल हमीद (नागझिरी) चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात सामाजिक ऐक्य टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते, त्याच्या प्रभावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून शांतता जपली पाहिजे. युवकांनी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सौहार्दासाठी एकोप्याने राहावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे होते, प्रमुख उपस्थितींमध्ये पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस…
कांदा निर्यात शुल्क 1 एप्रिलपासून रद्द जळगाव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी मध्यंतरी केंद्राने हे शुल्क लागू केले होते.. मात्र, यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर…
ट्रकचे ब्रेक फेल; दुर्घटनेतील जखमी रिक्षाचालकाचा मृत्यू जळगाव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह पाच दुचाकींना धडक बसली. या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले यापैकी रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २२ मार्चरोजी दुपारी सुरत रेल्वेगेटजवळ मालधक्क्यावरून सिमेंट भरून (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरून मागच्या बाजूने येऊ लागला. पूर्णपणे भरलेला ट्रक भरधाव रिव्हर्स येत अाल्याने त्याने तीन रिक्षा आणि पाच दुचाकींना चिरडले. यात…
६७ वर्षीय वृद्धाकडून मतिमंद तरूणावर अनैसर्गिक अत्याचार पाचोरा ( प्रतिनिधी)- तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय मतिमंद तरूणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ मार्च रोजी सायंकाळी घडली. ६७ वर्षीय वृद्धाने हे कृत्य केल्याचा आरोप असून घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावातील बसस्थानकाजवळ ३० वर्षीय मतिमंद युवक फिरत होता. याचवेळी गावातील वृद्धाने त्याला गोड बोलून जवळच्या शेतात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हे त्या परिसरात मधमाशांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिले. त्यांनी हस्तक्षेप करत वृद्धाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फरार झाला. पीडित मतिमंद तरूणाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाण्यात हा…