लेवा पाटीदार प्रिमीअर लिगकडून महिला , पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीगचे २८ ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी क्रिकेट लीगचे उदघाटन केले जाईल. शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ येथे सामने भरविण्यात येणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे ब्रँड अँबेसिडर आहेत. या स्पर्धेल पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ अशी स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत. पहिल्यांदाच महिलांसाठी बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली आहे. आयोजकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि…
Author: Vikas Patil
गृहकर्जाचे हप्ते भरूनही रक्कम बुडीत खात्यात; अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हे जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीच्या गृहकर्ज वसुलीत घोटाळा झाला आहे. थकलेले हप्ते भरूनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रक्कम कर्जधारकाच्या खात्यात न भरता अन्यत्र वळवल्याने शेतमजुर कर्जदाराचे घर कंपनीने सील केले शहर पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळसखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील शेतमजूर विजय चिंचोले (वय २६) यांनी अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते. मात्र, त्यांचे ७ हप्ते थकीत राहीले. या हप्त्यांची रक्कम ५२ हजार रुपये त्यांनी ती वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याकडे भरली. कोळी यांनी वरिष्ठ अधिकारी विजय आचलकर आणि आदिती तळवलकर…
ट्रॅक्टर उलटून अपघात: चालकाचा मृत्यू रावेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अजंदे शिवारात भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील भीमराव मेढे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर घनश्याम हरणकर (विवरा ) यांच्या माती वाहतुकीच्या कामावर लावण्यात आले होते. चालक विजय तायडे (वय 45) आज विवराहून अजंदेकडे वेगाने जात असताना पांडुरंग पाटील यांच्या शेताजवळ नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी अँगलला धडकल्याने पलटी होऊन विजय तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक भीमराव मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे…
ट्रॅक्टरच्या धडकेने १५ वर्षीय मजुराचा मृत्यू पारोळा (प्रतिनिधी)- शिरसोदे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने १५ वर्षीय मजुराचा बळी घेतल्याची घटना आज पहाटे तीन वाजता बोरी नदीपात्रात घडली. ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना ट्रॉलीच्या धडकेत हा मजूर जागीच ठार झाला. चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून चालकाला अटक करण्यात आली आहे. शिरसोदे (ता. पारोळा) येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना ट्रॅक्टरची ट्रॉली मागे घेताना १५ वर्षीय गौतम भिल याला धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. चालक अजय भिल याने जखमीच्या भावाला माहिती दिली. नंतर बहादरपूर सरकारी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.…
दिनेश बागडेला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक अमळनेर प्रतिनिधी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये अमळनेर येथील दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. नवी दिल्ली येथे २६ मार्च रोजी दुपारी या स्पर्धेत दिनेशने १०७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. नवी दिल्ली येथे २० ते २७ मार्चदरम्यान झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम स्पर्धेत १३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वेटलिफ्टिंगच्या १०७ किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत सात स्पर्धक आमनेसामने होते. मात्र, दिनेशने उत्कृष्ट प्रदर्शनाने सर्वांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले. दिनेशने अंतिम फेरीत सात स्पर्धकांवर मात करत सुवर्णपदक मिळवले. गेल्या स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळेस त्याने सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण…
लाचखोर भूकरमापक एसीबीच्या ‘मोजणीत’ अडकला जळगाव (प्रतिनिधी)- रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. कुलकर्णी यांनी शेतजमिनीच्या मोजणीसाठी एका शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. तक्रारदार (वय ३०) आणि त्यांचे काका यांची मस्कावद येथे सामाईक शेती आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ७ जानेवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते. १८ फेब्रुवारी रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जमिनीची मोजणी केली. मोजणीच्या खुणा दाखवण्यासाठी कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर कुलकर्णी यांनी पैशांऐवजी शेतातील…
मुल्यवर्धित कराच्या तफावतीची सरकारला ‘अशीही’ नशा; परमिटरूमचालकांची धोरणाच्या ‘उताऱ्यासाठी’ धावपळ ! श्रीरामपूर (प्रतिनिधी)- परमीट रुम व वाईन शॉपवरील व्हॅट टॅक्स तफावतीमुळे बेकायदेशीर मद्यविक्रीत वाढ होवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा आरोप श्रीरामपूर तालुका लिकर असोसिएशनचे माजी सल्लागार सुनील मुथा यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातमुथा यांनी म्हटले आहे की, परमिट धारकांना विक्री केलेल्या मद्यावर दहा टक्के व्हॅट टॅक्स भरावा लागतो. परंतु वाईन शॉप आणि बिअर शॉपीमधून विक्री केलेल्या मद्यावर मात्र व्हॅट टॅक्स भरावा लागत नाही. परिणामी ग्राहकांना परमिटरूम मधील मद्यावर पंचवीस ते तीस रुपये प्रतिबाटली मागे जादा मोजावे लागतात. किमतीतील या तफावतीमुळे ग्राहकांनी परमिट रूमकडे पाठ फिरवली असून परमिट…
भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींवर तारण कर्ज मिळणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींवर तारण कर्ज मिळणार आहे. तसे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनाही पीककर्ज, शेती विकासासाठी मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज देता येणार आहे. कर्जासाठी शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. शेतकऱ्यांना बँका कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून पासून मुंबई । प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन ३० जून पासून सुरु होईल, अशी घोषणा दोन्ही सभागृहात करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले. ३ मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अधिवेशनात १६ दिवस कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संतोष देशमु्ख हत्याकांडात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे म्हणजे आहेच – मनोज जरांगे बीड (प्रतिनिधी)- संतोष देशमु्ख हत्याकांडात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे म्हणजे आहेच. त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करा. एका चिल्लर कामासाठी चांगल्या लेकराचा खून केला याचे वाईट वाटते. एक नंबरच्या आरोपीने हे करायला लावले हे इतरांनी कबूल केले आहे. आता यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहीजे”, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि सरकारवर जोरदार टीका केली. पुढे ते म्हणाले की, वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच…