आता सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच शहरात अवजड वाहनांना प्रवेश जळगाव (प्रतिनिधी)- शहरातून दिवसभर होणारी अवजड वाहनांची वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. आता सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच शहरातून अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे. अवजड वाहनांना प्रवेशाविषयी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात बंदी राहणार असल्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेविषयी नियमावली ठरवून दिलेली आहे. आठ वर्षांपूर्वी काढलेल्या अद्यादेशानुसार बाजारपेठेत मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना सकाळी ११ ते दुपारी ४ व रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत परवानगी देण्यात आली होती. दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या, रहदारी तसेच…
Author: Vikas Patil
वक्फ विधेयकाला नव्हे; अफरातफरीला विरोध- उध्दव ठाकरे मुंबई (प्रतिनिधी)– वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैरहिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? वक्फ बोर्डावर गैरमुस्लिम ते कसे सहन करतील. वक्फ बोर्डात अफरातफर सुरू असेल तर नक्कीच पायबंद घातला पाहिजे. विकास, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद…
दर कपातीच्या आदेशाला वीज नियामक आयोगाचीच स्थगिती जळगाव (प्रतिनिधी)- महावितरणच्या वीज दर कपातीच्या आदेशाला राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता नवा आदेश येईपर्यंत महावितरणच्या ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आहे. महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती. वीज नियामक आयोगाने त्यावर निर्णय घेत २८ मार्च रोजी वीज बिलात ७ ते १० टक्के कपात करण्याचा निर्णय दिला होता. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीही होणार होती. पण महावितरण दरवाढीच्या हट्टावर कायम राहिली. कंपनीने फेरविचार करण्यासाठी अर्ज दाखल केला. आयोगाचे आदेश सुस्पष्ट नाही, त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होईल, असे कारणही दिले. त्यामुळे आयोगाने तत्काळ आपल्याच…
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के मुंबई (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या तीन ठिकाणी आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे हे सौम्य धक्के बसले असून याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ट्विटरवर दिली आहे. सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून ५ किमी खाली होते. सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. २८ मार्चरोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या परिसरात…
नोकरीचे बनावट आदेश देऊन १३ लाखांत फसवणूक जळगाव (प्रतिनिधी)- भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी पदावर मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट आदेश देत ३ जणांनी पिंप्राळ्यातील निवृत्ताची १३ लाखांत फसवणूक केली. रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी गोकूळ पाटील (रा. पिंप्राळा) यांची मुलगी बीई झाली आहे. ते मुलीसाठी नोकरीच्या शोधात होते. भाऊ मधुकरचा मित्र संजय कोळी (रा. जैनाबाद) यांच्याशी मार्च २०२३ मध्ये त्यांची भेट झाली. तेव्हा त्याने मुलीला रेल्वेत नोकरीत लावून देतो, माझा मित्र सतीश पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) हे काम करून देईल. त्यासाठी १३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. गोकूळ पाटील यांनी सतीश…
विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या सहलीची संधी यावल (प्रतिनिधी)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५२ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो सहलीसाठी संधी मिळाली आहे. अहमदाबाद येथील इस्रो (विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर) आणि सायन्स सिटीला भेट देण्यासाठी हे विद्यार्थी रवाना झाले आहेत. आज या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सहलीचे अनुभव लेखी स्वरूपात पाठवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या सहलीसाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक वयोगटातून प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. १८ विद्यार्थी आणि ६ शिक्षक-कर्मचारी या सहलीसाठी रवाना झाले आहेत. विद्यार्थी रेल्वेने…
पडताळणीसाठी सहकार्य न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे फळ पीकविमा योजनेंतून बाद होणार जळगाव (प्रतिनिधी)- हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतात केळी लागवड केली आहे की नाही? याबाबतची पडताळणी कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पडताळणी दरम्यान सहकार्य केले नसल्याने, या शेतकऱ्यांचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने पीकविमा कंपनीला ५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पडताळणी करून, अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा क्षेत्राची पडताळणीसाठी सहकार्य केलेले नाही, अशा शेतकऱ्यांचे पीकविम्यासाठीचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना…
वैद्यकीय अधिकारी तरुणीची छेड जळगाव (प्रतिनिधी)- रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढल्याचा प्रकार जळगाव तालुक्यात घडला. वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीचा पाठलाग करत तिला इशारे करून छेडखानी काढल्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात शासकीय रुग्णालयात तरुणी वैद्यकीय अधिकारी आहे. तरुणी नोकरीला असलेल्या रुग्णालयात जाऊन तसेच रस्त्याने येता- जाताना तिचा सातत्याने पाठलाग करत त्रास दिला जात होता. या तरुणाने तरुणीला तिचा फोन नंबर मागितला. तसेच तू माझ्याशी फोनवर बोल असे म्हणत तिची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. रोज होत असलेल्या प्रकाराला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसात धाव घेतली. छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली असून नशिराबाद पोलिस ठाण्यात…
जुन्या वादातून तिसऱ्याच्या रिक्षेत पिस्तूल ठेवणारे दोघे पकडले जळगाव (प्रतिनिधी)- एका रिक्षाचालकाकडून जिवंत काडतूस आणि पिस्टल शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली होती. तपासामध्ये जुन्या वादातून दोघंानी हे कारस्थान रचल्याचे उघडकीस आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेरी नाका परिसरात २८ मार्चरोजी दुपारी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालक राहुल रंगराव पाटील (रा. कुसुंबा) याच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्याच्या रिक्षेत देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सत्य बाहेर काढले रिक्षाचालक राहुल पाटील यांच्यासोबत कुसुंबा येथील नितीन तायडे (वय २५) याचे वारंवार…
तहसीलदारांच्या बनावट सह्यांसह जन्म-मृत्यूचे ४३ बोगस दाखले मिळवण्याचा प्रयत्न ; चौकशीनंतर गुन्हे नोंदवणार जळगाव (प्रतिनिधी)- महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात ४३दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्याच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीनंतर महापालिका आणि तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात अवघ्या बारा दिवसांत ५० अर्ज दाखल झाले होते त्यातील ४९ जन्मदाखले आणि १ मृत्यू दाखला होता. कर्मचारी तपासणी करत असताना तहसीलदारांच्या सहीबाबत शंका निर्माण झाली. चौकशीदरम्यान, फक्त 7 दाखल्यांवर खऱ्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले, उर्वरित 43 दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या.…